आशा सेविकांना मिळणार मोबाईल, नवी मंजुरी ! smart phone for asha sevika maharashtra !
राज्यात आरोग्य विषयक विविध योजना आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात महत्वाचा सहभाग असलेल्या आशा सेविकांना व गट प्रवर्तक
यांना मोबाईल देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध आरोग्य विषयक राबविल्या जातात, ग्रामीण भागात आशा सेविकांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते त्यासाठी आरोग्य विभागाने एक सॉफ्टवेअर तायर केले आहे ज्यामधून आरोग्य विषयक कार्यक्रमाची अद्यावत माहिती उपलब्ध होणार आहे, व यानुषंगे आवश्यक त्या उपाययोजना करणे शक्य होणार आहे, आणि या साठी राज्यातील आशा सेविका व गटप्रवर्तक यांना मोबाईल फोन देण्याची योजना आहे.
दिनांक १० ऑगस्ट २०२१ रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेऊन या योजनेत ५००४ मोबाईल खरेदी साठी ४ कोटी निधी स प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
0 टिप्पण्या