नागपूर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र (नागपूर ग्रामीण भागासाठी) ३९ जागा व
आधार सेवा केंद्र (फक्त आपले सरकार सेवा केंद्रचालकांसाठी) ५० जागा अर्ज मागविण्यात आले आहेत.
प्रत्येक ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात किमान एक केंद्र स्थापन करण्यात येईल, मात्र ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या(२०११च्या जनगणनेनुसार)किमान २ केंद्रे स्थापन करण्यात येईल.
शहरी भागासाठी आपले सरकार केंद्रासाठी महानगरपालिका व नगरपरिषद १०,००० लोकसंख्येसाठी एक केंद्र स्थापन करण्यात येईल या नियमानुसार,
गपूर जिल्ह्यातील सध्या रिक्त असलेल्या केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://nagpur.gov.in/mr/ या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
रिक्त असलेल्या जागेसाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी वरील संकेत स्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करून सदरचे अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह २४/०८/२०२१ पर्यंत महा आय टी सेल, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे सादर करावेत.
आपले सरकार सेवा केंद्राबाबत माहितीसाठी माहिती व तंत्रज्ञान कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे संपर्क साधावा.
- आपले सरकार सेवा केंद्र अर्ज मागणी –
- ०९ /०८/२०२१ ते २४/०९/२०२१
- प्राप्त आपले सरकार सेवा केंद्रांच्या मागणी अर्जाची छानणी –
- ३०/०८/२०२१
- प्राप्त आपले सरकार सेवा केंद्रांच्या मागणी अर्जाचा निकाल
- ०७/०९/२०२१
अर्जाचा नमुना - आपले सरकार सेवा केंद्र FORM Download
अटी व शर्ती, जाहिरात
याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात ३६ मंडळ व महापालिका भागात १४ असे एकूण ५० आधार सेंटर देण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे, त्याकरिता आपले सरकार सेवा केंद्र चालकाकडून अर्ज मागविण्यात आले आहै आधार केंद्र केंद्र अर्ज मागणी –
- ०९ /०८/२०२१ ते २४/०९/२०२१
- प्राप्त आधार केंद्रांच्या मागणी अर्जाची छानणी –
- ३०/०८/२०२१
- प्राप्त आधार केंद्रांच्या मागणी अर्जाचा निकाल
- ०७/०९/२०२१
जाहिरात : आधार सेवा केंद्र
0 टिप्पण्या