अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदे 11 महिन्यांकरीता मुदतवाढ देण्यात आली.
राज्यातील अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र न सादर केलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदे 11 महिन्यांसाठी मुदतवाढ आली आहे.
अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचा विविध कारणास्त अधिसंख्य पदावर कार्यरत वर्ग करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्ये इतकी कर्मचारी सध्या ज्या काही पदावर कार्यरत असतील त्या पदांचे अधीसंख्य पद निर्माण करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक.29 डिसेंबर 2019 चा तरतुदीनुसार अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने सेवामुक्त करण्यात आलेले कर्मचारी यांच्या सेवा समाप्ती पूर्वी ते ज्या पदावर कार्यरत होते त्या पदांचे अधिसंख्य पद निर्माण करून त्यांना मानवतावादी दृष्टिकोनातून व प्रशासनाची होणारी अडचण दूर करण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांना तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यांसाठी किंवा ते सेवेत राहिले असते तर ते ज्या दिनांकाला सेवानिवृत्त झाले असते त्या दिंनाकापर्यंत यापैकी जे आधी घडेल तो पर्यंत अधिसंख्य पदावर नेमणूक देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक.30/06/2020 अन्वये सदर आधिसंख्य पदे निर्माण करण्याचे प्राधिकार प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार संदर्भ क्र. 4 अन्वये 74 अधिसंख्य निर्माण करून 11 महिन्यांसाठी अधिसंख्य पदावर त्यांच्या सेवा वर्ग करण्यात आल्या आहेत.
🟠पाहा,शासन निर्णय दिनांक.19 जानेवारी, 2022
सदर कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदावर सेवा वर्ग केल्याची मुदत दिनांक. 15/06/2021 रोजी समाप्त झाली असल्याने त्यांना दिनांक.16/06/2021 पासून पुन्हा मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.
या शासनाच्या निर्णयान्वये उपरोक्त 74 अधीसंख्य पदांपैकी प्रपत्र अ मधील 12 व प्रपत्र ब मधील 1 असे एकूण 13 अनुसूचित जमातीतील कर्मचारी हे सेवानिवृत्त झालेले असल्याने सदर पदे वगळून उर्वरित प्रपत्र अ मधील 39 व प्रपत्र ब मधील 13 व प्रपत्र क मधील 9 असे एकूण 61 अनुसूचित जमातीतील गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या पुढे 11 महिन्यांच्या कालावधी करिता म्हणजे दिनांक. 16 जून 2021 ते दिनांक. 15 मे 2022 या कालावधीकरीता किंवा ते सेवेत राहिले असते ते ज्या दिनांकाला सेवानिवृत्त सेवानिवृत्त झाले असते त्या दिनांकापर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत अधिसंख्य पदांना या शासन निर्णयान्वये मुदतवाढ देण्यात येत आहे.
🟠पाहा,शासन निर्णय दिनांक.19 जानेवारी, 2022
CSC केंद्राकरिता BC बँक मित्र साठी ऑनलाईन अर्ज सुरु. | BC Bank Mitra.
आपले सरकार सेवा केंद्र, नवीन आपले सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु.| Apale Sarkar Sewa Kendra.
पिक विमा संदर्भास महाराष्ट्र शासनामार्फत महत्वपूर्ण निर्णय. | Pik Vima Maharastra.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्वृत्ती योजनाच्या अर्जास मुदतवाढ.| Swadhar Scholarship Yojana 2022
सन 2022 मध्ये राष्ट्र पुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करण्यासाठी शासन निर्णय जारी.
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना 2021
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना 2021
रमाई आवास (घरकुल) योजना ! Ramai Awas Yojana 2021
बैलगाडी शर्यतीस अखेर परवानगी मिळाली.
माझी वसुंधरा अभियान 2.0 राज्यामध्ये राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना 2021 | Mukhyamantri Krushi and Food Prakriya Yojana
0 टिप्पण्या