Ad Code

इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार चित्रकला विषयाचे गुण.

इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार चित्रकला विषयाचे गुण.
चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्यानां विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त गुण.
  शासनाच्या शुध्दीपत्रकान्वये शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची सुधारीत कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र.1 येथील शासन निर्णयानातील परिपत्रक क्र. 2.3.2 मध्ये " विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजीएट ड्राॅईगं ग्रेड परीक्षेचे गुण मिळणार नाही." अशी तरतूद आहे.


      तथापि कोविड-19 चा प्रादुर्भाव व त्यामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे सन 2020-21 या वर्षी शासकीय रेखाकला परीक्षांचे आयोजन होऊ शकलेले. सन 2020-21 मध्ये शासकीय रेखकला परीक्षा आयोजित न झाल्यामुळे विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा देऊ शकलेले नाहीत. त्यांना परीक्षा देण्याची संधी मिळू शकलेली नाही. अशा विद्यार्थ्यांनी केवळ इंटरमिजीएट ड्राॅईगं ग्रेड परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या श्रेणीच्या आधारे, त्यांना सन 2021-22 या वर्षा पुरते सवलतीचे गुण देण्यास मान्यता प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता यासंदर्भात खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.      
कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे, सन 2021-22 या वर्षी इयत्ता 10 वीच्या परीक्षेला बसणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना सन 2020-21 या वर्षी एलिमेंटरी ड्राॅईगं ग्रेड परीक्षेला बसता आले नाही, अशा विद्यार्थ्यांनी सन 2020-21 मध्ये केवळ इंटरमिजीएट ड्राॅईगं ग्रेड परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या श्रेणीच्या आधारे, त्यांना सन 2021-22 या वर्षांपूरते सवलतीचे गुण देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सदर निर्णय फक्त सन 2021-22 या शैक्षणिक वर्षा पुरता लागू राहणार आहे.

शासन निर्णय दिनांक.21 फेब्रुवारी,2022


इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार चित्रकला विषयाचे गुण. 

अर्थसंकल्प 11 मार्च ला असून अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई मध्ये आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा निधी होणार खात्यावर जमा. | Swadhar Yojana.

कृषि कल्याण अभियानातंर्गत कृषि औजार बँक स्थापनेसाठी अर्ज सुरू.

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणासमवेत करार करण्यास मान्यता देण्यात आली.



गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ धारकांना निधी वितरित करण्यात येणार आहे. | Gopinath Munde Shetkari Apaghat Vima Yojana.

मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतंर्गत मंजूर गावांची यादी आली.| मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना 2021-22

नवीन घरकुलांना मिळाली मंजूरी. | पाहा या जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार घरकुल.

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना 2021

प्रधानमंत्री आवास योजनेचा (ग्रामीण) निधि वितरित करण्यास मान्यता मिळाली ! Pradhanmntri Awas Yojana  2021 

रमाई आवास (घरकुल) योजना ! Ramai Awas Yojana 2021

👉 Whatsapp gruap Superfast information -  Link

👉 Whatsapp gruap Superfast information 2 - Link

👉 Teligram channel - Link

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu